Dhurandhar Movie : पिक्चरचा हिरो Ranveer Singh असला तरी अख्ख मार्केट खाल्लय ते Akshaye Khanna ने..

0
Share
Copy the link

#BolBhidu #Dhurandhar #AkshayeKhanna

शपथेवर सांगतो, गाण्यातला एक शब्द सुद्धा कळत नाही, पण ऐकायला मजा येते. आधी अशी मजा आली होती, इम्रानचं कहो ना कहो आणि बॉबीचं जमाल कुडू ऐकताना, पण यावेळी मजा नुसती ऐकण्यात नाही, बघण्यात सुद्धा आहे, कारण स्क्रीनवर तो आहे, स्वतः तो. कधीकाळी टक्कल पकडलं म्हणून इंडस्ट्रीमधून गायब झालेला तो, कधीकाळी याचा पिक्चर आला तरी कोण बघणार असं वाटणारा तो, आता स्क्रीनवर येतो आणि सगळं मार्केट खाऊन टाकतो. आर माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, रणवीर सिंग हे काय किरकोळ ऍक्टर नाहीत, त्यात संजूबाबाची एंट्री हा स्पेशल विषय असतो, पण धुरंधर रिलीझ झाल्यापासून चर्चा फक्त एकाच माणसाची आहे, त्याच्या एंट्रीला लागलेल्या गाण्याची, त्याच्या कमी पण भारी डायलॉग्सची, त्याच्या क्रूर ऍक्शनची, त्याच्या चालण्याची, दिसण्याची, मारण्याची, त्यानं राडा केल्याची. ही स्टोरी खऱ्या धुरंधरची, अक्षय खन्नाची. थोडी फिल्मी पण पूर्ण खरी.

Check out CottonKing – Men’s Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO…

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
https://www.youtube.com/@BolBhidu

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/

Comments

Your email address will not be published. Required fields are marked *